Job Alert : अर्ज न करता थेट द्या मुलाखत!! गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत टीचिंग/नॉन टीचिंग स्टाफची मोठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । गोखले एज्युकेशन सोसायटी (Job Alert) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.

नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटी ही राज्यातील नामांकित शिक्षण संस्था आहे. सध्या या संस्थेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी भरती होत आहे. या भरतीच्या (Job Alert) माध्यमातून एकूण 105 उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा नाही; कारण इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार असून मुलाखतीची तारीख 12, 13 आणि 15, 16 एप्रिल 2024 आहे. पाहूया भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक
भरले जाणारे पद – टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ
पद संख्या – 105 पदे (Job Alert)
नोकरी करण्याचे ठिकाण – नाशिक
अर्ज फी – Rs.200/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – सर डॉ. एम.एस. गोसावी इन्स्टिट्यूट फॉर आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रि. टी. ए. कुलकर्णी विद्यानगर, नाशिक-५
मुलाखतीची तारीख – 12, 13 आणि 15, 16 एप्रिल 2024

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
टीचिंग स्टाफ64
नॉन टीचिंग स्टाफ41
Vacancy Details
Post NameTotal Qualification
Teacher (Pre-Primary)13Montessori Course (English Medium & Marathi Medium)
Head Master04D.T.Ed/ B.Ed
Teacher (Primary)16D.T.Ed/ B.Ed (English Medium & Marathi Medium)
Drawing Teacher04A.T.D
Computer Teacher04B.Sc (Computers)
Teacher (Secondary)22B.Sc,B.Ed /B.A,B.Ed (Relevant Subject)
Physical Education Teacher03B,P.Ed
Librarian03B.Lid
Jr Clerks09B.Com
Laboratory Asst0212th Pass (Science)
Peons099th Class
Aaya134th Class
Helper/Sweeper054th Class

अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहेत.
2. इच्छुक आणि पात्र (Job Alert) उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
3. मुलाखतीची तारीख 12, 13 आणि 15, 16 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF 1
PDF 2
अधिकृत वेबसाईट – https://gesociety.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com