Job Alert : राज्यातील ‘या’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची संधी; पगारही मिळेल उत्तम 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूरमध्ये नोकरी (Job Alert) करण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने होणार आहे.  या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 03 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.

संस्था – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर
भरले जाणारे पद – वरिष्ठ निवासी (Senior Resident)
पद संख्या – 52 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता कार्यालय, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडा पार्क, कोल्हापूर.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. / एम.एस. / डी.एन.बी. अभ्यासक्रम उत्तीर्ण केला असावा. पदव्युत्तर पदवी (Job Alert) उत्तीर्ण धारकास प्राधान्य देण्यात येईल. तसेच शासन निर्णयानुसार बंधपत्रित उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. उमेदवाराकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची कायम नोंदणी असणे आवश्यक.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 ऑक्टोबर 2023 रोजी 45 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी – 250/- रुपये
मिळणारे वेतन – 25,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.rcsmgmc.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com