करिअरनामा ऑनलाईन । शिकण्याची उमेद असणाऱ्या (JNVST Admission) ग्रामीण भागातील हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी ही प्रवेश परीक्षा जवाहर नवोदय विद्यालयाकडून घेतली जाते.
शहरी आणि ग्रामीण असा शैक्षणिक भेद दूर करणे आणि उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न जवाहर नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून केला जातो. जेएनव्हीएसटीची (JNVST) स्थापना ग्रामीण विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता ओळखण्याच्या आणि त्यांचे संगोपन करण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आली आहे. या विद्यालयाचे प्राथमिक उद्दिष्ट देशभरातील जवाहर नवोदय विद्यालयांच्या प्रवेशासाठी इयत्ता 6वीतील विद्यार्थ्यांची निवड करणे हा आहे. आज आपण प्रवेशा संदर्भात महत्वाची माहिती पाहणार आहोत….
प्रवेश प्रक्रिये संदर्भात महत्वाच्या तारखा –
1. इयत्ता 6वी – शनिवार दि. २० जानेवारी २०२४
2. इयत्ता 9वी – शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४
3. इयत्ता 11वी – शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४
1. 6वीसाठी आवश्यक पात्रता – (JNVST Admission)
– जवाहर नवोदय विद्यालय असलेल्या जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारच प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
– सहावीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार १० ते १२ वयोगटातील असावा. हाच नियम अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींमधील (एसटी) उमेदवारांसह सर्वांना लागू होतो.
-इयत्ता सहावीला प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार सरकारी/अनुदानित/मान्यताप्राप्त शाळेतून तिसरी, चौथी आणि पाचवीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा.
इयत्ता सहावीचा पेपर पॅटर्न असा असेल –
(अनुक्रमे -: विषय – प्रश्नांची संख्या – गुण – वेळ)
1. मानसिक क्षमता – ४० – ५० – ६० मिनिटे
2. अंकगणित – २० – २५ – ३० मिनिटे
3. भाषा – २० – २५ – ३० मिनिटे
एकूण – ८० – १०० – २ तास
2. 9वीसाठी आवश्यक पात्रता
– नवोदय विद्यालयाचे रहिवासी आणि इयत्ता आठवीचा अभ्यास करत असलेले उमेदवारच नववीच्या प्रवेशासाठी पात्र आहेत.
-जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शाळा जेथे जवाहर नवोदय विद्यालय कार्यरत आहे आणि जेथे प्रवेश मागितला आहे, ते विद्यार्थी पात्र आहेत. (JNVST Admission)
– प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार प्रवेशाच्या वर्षाच्या १ मे रोजी १३-१५ वर्षे वयोगटातील असावा. हा नियम सर्व वर्गातील उमेदवारांना लागू आहे.
-परीक्षेसाठी भाषेचे माध्यम इंग्रजी/हिंदी आहे.
इयत्ता नववीचा पेपर पॅटर्न असा असेल –
(विषय – गुण)
1. इंग्रजी – १५
2. हिंदी – १५
3. गणित – ३५
4. विज्ञान – ३५
एकूण गुण – १००
एकूण वेळ – २.५ तास
3. इयत्ता 11वीसाठी आवश्यक पात्रता
– उमेदवाराने सीबीएसई किंवा इतर कोणत्याही राज्य शिक्षण मंडळाशी/इतर सरकार मान्यताप्राप्त मंडळाशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त शाळेतून दहावीचे शिक्षण घेतलेले असावे.
– भारतातून दहावीचे शिक्षण घेतलेले (JNVST Admission) भारतीय नागरिकच अर्ज करण्यास पात्र आहेत.
– निवड चाचणी सकाळी ११ ते दुपारी दीडपर्यंत अशी एकूण अडीच तासांची असेल. त्यात वस्तुनिष्ठ प्रश्नांचे ५ विभाग असतील. १०० गुणांसाठी एकूण १०० प्रश्न असतील.
(अनुक्रमे -: विषय – प्रश्नांची संख्या – गुण – वेळ)
1. मानसिक क्षमता – २० – २० – ३० मिनिटे
2. इंग्रजी – २० – २० – ३० मिनिटे
3. विज्ञान – २० – २० – ३० मिनिटे
4. सोशल सायन्स – २० – २० – ३० मिनिटे
5. गणित – २० – २० – ३० मिनिटे
एकूण – १०० – १०० – २ तास ३० मिनिटे
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com