Jio Recruitment : खुशखबर!! नोकरी शोधणाऱ्यांसाठी Jio सरसावली; IIT मध्ये Jio देणार नोकऱ्या

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी (Jio Recruitment) जिओ कंपनी पुढे आली आहे. कारण जिओने IIT ISM धनबादने वर्ष-2023 बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम कॅम्पस प्लेसमेंट सुरू केले आहे.

शनिवारपर्यंत हा आकडा 300 च्या पुढे जाईल. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये, संगणक विज्ञान, गणित आणि संगणन, इलेक्ट्रिकल, पेट्रोलियम यासह इतर शाखांचे विद्यार्थी या कंपन्यांचे आवडते आहेत. विदेशी कंपनी Accenture जपाननेही सात विद्यार्थ्यांची निवड केली आहे.

ऑनलाइन आणि ऑफलाइन कॅम्पस प्लेसमेंट केले जात आहे. अनेक कंपन्या सर्व प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करत आहेत. 240 विद्यार्थ्यांना पीपीओसह इतर माध्यमातून नोकऱ्या (Jio Recruitment) मिळाल्या आहेत. यानंतर 1 डिसेंबरपासून रीतसर सुरू झालेल्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आतापर्यंत ही संख्या 226 वर पोहोचली आहे.

सूत्रांच्या महितीनुसार रिलायन्स जिओने जास्तीत जास्त 34 विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊ केल्या आहेत. यामध्ये संगणक विज्ञान अभियांत्रिकी, दुहेरी पदवी संगणक विज्ञान, गणित आणि संगणन यासह इतर शाखांच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

केयर्न ऑइल गॅसने 20 विद्यार्थ्यांना ऑफर दिली आहे. पेट्रोलियम इंजिनीअरिंग, अप्लाइड जिओफिजिक्स, अप्लाइड जिओलॉजीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. टाटा स्टीलच्या विविध शाखांनी विद्यार्थ्यांसाठी नोकरीची नियुक्ती जाहीर केली आहे.

यापैकी टाटा मोटर्सने 19, टाटा स्टील एनव्हायर्नमेंटने चार, टाटा (Jio Recruitment) स्टील मिनरल्सने दोन, टाटा स्टील सीएस अँड आयटीने चार, टाटा स्टील ऑटोमेशन तीन, टाटा स्टील एजीएल चार निकाल जाहीर केले आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com