JEE Main Result : JEE मेनचा निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप्स करा फॉलो; इथे आहेत महत्वाच्या लिंक्स

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक (JEE Main Result) महत्वाची अपडेट समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने JEE मेन परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत सहभागी असलेले सर्व विद्यार्थी jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांची उत्तरतालिका (JEE मुख्य 2023 उत्तर की) तपासू शकतात.

यावर्षी जेईई मेन परीक्षेला बसण्यासाठी साधारण 9 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. NTAकडून या विद्यार्थ्यांसाठी मुख्य परीक्षेचा निकाल कधीही (JEE Main Result) जाहीर केला जाऊ शकतो. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. उत्तरतालिका तपासण्याची थेट लिंक पुढे देण्यात आली आहे.

असा चेक करा निकाल – (JEE Main Result)

  1. JEE मुख्य निकाल पाहण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
  2. वेबसाइटच्या होमपेजवरील JEE मेन रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
  3. लिंकवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  4. लॉगिन केल्यानंतर तुमचे स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल.
  5. शेवटी ते तपासा आणि भविष्यातील वापरासाठी हार्ड कॉपी देखील ठेवा.

यावर्षी पहिल्या सत्रासाठी जेईई मेन २०२३ पेपर १ परीक्षेत बसण्यासाठी साधारण ९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांमध्ये २.६ लाखांहून अधिक मुली आणि ६ लाखांहून अधिक मुलांचा समावेश आहे.

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत (JEE Main Result) विद्यार्थ्यांपैकी ९५.७९% विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगचा पेपर लिहिला तर ०.४६ लाख विद्यार्थ्यांनी पेपर १ मध्ये परीक्षा दिली. जेईई मेन सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसले आहेत.

अंतिम उत्तरतालिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा – CLICK

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा – CLICK

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com