JEE Main 2024 : कधी सुरु होणार JEE परीक्षेची नोंदणी? कोणत्या तारखेला होणार परीक्षा? पहा अपडेट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आयआयटी, एनआयटी आणि इतर (JEE Main 2024) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्स 2024 परीक्षा नोंदणीची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान जेईई मेन्स 2024 परीक्षेविषयी नवीन अपडेट हाती आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जेईई मेन्स 2024 परीक्षेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु जर आपण मागील वर्षांचा कल पाहिला तर आपण परीक्षेच्या तात्पुरत्या तारखांचा अंदाज लावू शकतो. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA लवकरच JEE मेन 2024 साठी नोंदणी सुरू करेल.

कधी सुरु होणार जेईई मेन्स 2024 साठी नोंदणी?
रिपोर्टनुसार जेईई मेन 2024 साठी नोंदणी डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येऊ शकते. पण अधिकृत तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. पण, अंदाज पाहता जेईई मेन 2024 साठी नोंदणी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होऊ शकते.
जेईई मेन्स 2024 परीक्षेची तारीख (JEE Main 2024)
जेईई मेन्स 2024 परीक्षेची नोंदणी डिसेंबर महिन्यात सुरू होणं अपेक्षित आहे. तर नोंदणीसाठीची शेवटची तारीख जानेवारी 2024 असू शकते. त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म दुरुस्तीची शेवटची तारीख जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात असू शकते. यानुसार, जेईई मेन 2024 परीक्षा फेब्रुवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे.

परीक्षेसाठी कोण करु शकतं अर्ज?
पीसीएम (PCM) विषयासह बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवारच या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. उमेदवाराकडे भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Maths) विषय असणं (JEE Main 2024) आवश्यक आहे. जेईईमध्ये चांगले रँक मिळवणारे जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेला बसू शकतात.
अधिकृत वेबसाईट
जेईई मेन्स परीक्षा 2023 साठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. यासाठी तुम्हाला JEE Main च्या jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. या संकेतस्थळावरून अर्ज केले जातील आणि परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती येथूनच मिळू शकेल. नवीन अपडेट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी वेबसाईट तपासत रहायची आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com