IIT आणि IISC मध्ये प्रवेशासाठी अत्यंत गरजेची आहे JAM ही परीक्षा; आजच करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | आयआयटी आणि आयआयएससीच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता जवळ आली आहे. जर आपण अद्याप अर्ज केला नसेल तर लवकर अर्ज करा. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये, आयआयटी आणि आयआयएससीच्या एमएस्सी आणि एमएससी-पीएचडी इत्यादी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या JAM परीक्षेविषयी आपल्याला तपशीलवार सांगणार आहोत.

आपण पदवी प्राप्त केली असेल आणि पुढे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच आयआयएससी’मध्ये अभ्यास करायचा असेल तर, आपल्यासाठी JAM (Joint Admission Test for Masters) ही परीक्षा पास करणे फार महत्वाचे आहे. बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेतर्फे या वेळी JAM परीक्षा आयोजित केली जात आहे. या परीक्षेचे अर्ज 20 एप्रिलपासून सुरू झाले होते, मात्र आता अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे.

ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी घेतली जाते. परंतु यावेळी जागतिक संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या साथीमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या वेळी JAM 2021 परीक्षेची नोंदणी प्रक्रिया 20 मे 2021 रोजी भारतीय विज्ञान संस्थान, बेंगलुरूतर्फे बंद होईल. संयुक्त प्रवेश परीक्षा – मास्टर्ससाठी नोंदणी केलेले नसलेले उमेदवार आयआयएससी जामच्या jam.iisc.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आयआयटी, आयआयएससीचे एमएससी (दोन वर्षे), संयुक्त एमएससी-पीएचडी, एमएससी-पीएचडी ड्युअल डिग्री, एकात्मिक पीएचडी आणि इतर पदव्युत्तर पदवी कार्यक्रमांमध्ये प्रवेश मिळू शकतो. अर्जासाठी, जेएएम ऑनलाइन एप्लिकेशन प्रोसेस सिस्टम वेबसाइट (जेओएपीएस) वर लॉग इन करून उमेदवारास शैक्षणिक पात्रता, गुणांची टक्केवारी / सीजीपीए, श्रेणी, शारीरिक विषमता स्थिती इत्यादीसारख्या आवश्यक माहिती भराव्या लागतील. त्यानंतर आपण अर्ज करून परीक्षा देऊ शकता.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

http://bit.ly/3s7KvY2

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com