करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी (Jalsampada Vibhag Bharti 2023) मोठी अपडेट हाती आली आहे. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागात लवकरच मोठ्या प्रमाणावर पद भरती होणार आहे. अनेक वर्षांपासून जलसंपदा विभागातील नोकर भरती रखडली होती. 2013 मध्ये म्हणजे तब्बल 10 वर्षापूर्वी या विभागात पदभरती झाली होती. आता पुन्हा पद भरती होण्याची शक्यता आहे. पुढील महिना त्यादृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. या महिन्यात पदभरती होऊ शकते. त्यामुळे तरुणांनी आतापासूनच या पद भरतीची तयारी करणे फायद्याचे ठरणार आहे. राज्य शासनाने याविषयीची अधिकृत माहिती दिली नसली तरी, जलसंपदा विभागात पद भरती होण्याची चर्चा आहे.
अनेक दिवसांपासून होतेय चर्चा
राज्य सरकारच्या जलसंपदा विभागात अनेक दिवसांपासून पद भरती होण्याची चर्चा सुरु आहे. मध्यंतरी कोरोना काळात सर्वच प्रक्रिया थंडावल्या होत्या. पण आता निवडणुकांचा लवकरच (Jalsampada Vibhag Bharti 2023) हंगाम सुरु होईल. त्याअगोदर राज्य सरकार तरुणांना सरकारी नोकरी देण्याची तयारी करु शकते. यासंबंधीची अधिकृत कोणतीही माहिती नसली तरी नोकरी भरतीची चर्चा रंगली आहे.
इतकी पदे आहेत रिक्त
राज्याच्या जलसंपदा विभागात एकूण 16,185 जागांसाठी नोकर भरती होण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट 2023 पूर्वी याविषयीची अधिसूचना जारी होऊ शकते. जलसंपदा (Jalsampada Vibhag Bharti 2023) विभागात गट क संवर्गात सरळसेवा पध्दतीने भरती होईल. एकूण 8,014 जागा सरळसेवा पद्धतीने भरण्यात येतील. तर पदोन्नतीने 3,163 जागांची भरती करण्यात येणार आहे. एकूण 16,185 जागांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे.
गट ड पदासाठी भरती (Jalsampada Vibhag Bharti 2023)
गट ड संवर्गातील जागा सरळसेवा पद्धतीने भरण्यात येतील. एकूण 4,702 जागा थेट पद्धतीने भरता येईल. 306 जागा पदोन्नतीने भरता येतील. एकूण 5,008 पदे भरण्यात येणार आहेत. गट क आणि ड संवर्गातील मिळून सुमारे 16,185 जागांसाठी मेगा नोकर भरती करण्यात येईल. जलसंपदा विभागात 2013 पासून कोणतीही नोकर भरती झालेली नाही. त्यामुळे या विभागात रिक्त पदांचा अनुशेष वाढला आहे. लवकरच हा अनुशेष दूर करण्यात येईल, अशी शक्यता आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com