करिअरनामा ऑनलाईन । औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अनुत्तीर्ण (ITI Exam) विद्यार्थ्यांसाठीची पुरवणी परीक्षा लांबणीवर पडली आहे. 2014 पासूनच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून परीक्षा घेण्यात येत आहे. आठ वर्षांत बदललेल्या पॅटर्ननुसार परीक्षा नियोजनात आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे परीक्षांचे वेळापत्रक लांबणीवर गेल्याचे सांगण्यात येते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रशिक्षण महासंचालनालयातर्फे 2014 ते 2021 या कालावधीत औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था आयटीआयमध्ये प्रवेश घेतलेल्या, परंतु उत्तीर्ण न होऊ शकलेल्या प्रशिक्षणार्थींसाठी 20 नोव्हेंबरपासून पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तसे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र, निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा झाल्या नाहीत.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार परीक्षा (ITI Exam)
परीक्षा आता डिसेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगण्यात येते. आयटीआय अभ्यासक्रमाच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा परीक्षा देण्याची संधी असते, परंतु संचालनालयातर्फे विद्यार्थ्यांना विशेष संधी देण्यात आली. त्यानुसार परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया झाली.
ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ऐनवेळी वेळापत्रक लांबल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. परीक्षेचे निश्चित वेळापत्रक अद्याप आले नसल्याचे आयटीआय प्राचार्यांनी (ITI Exam) सांगितले. हॉल तिकीट सोबत हे वेळापत्रक विद्यार्थ्यांना कळेल असे सांगण्यात येते. पुरवणी परीक्षेला नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
नियोजनात अडचणी का आल्या?
महासंचालनालयामार्फत देण्यात आलेल्या या संधीनुसार वार्षिक पुरवणी परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला हॉलतिकीट विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. परीक्षांचे वेळापत्रक लांबणीचे कारण 2014 ते 2021 दरम्यान बदललेले विविध पॅटर्न असल्याचे सूत्रांनी (ITI Exam) सांगितले. सुरुवातीला ऑफलाइन लेखी परीक्षा, सत्र पद्धतीने घेण्यात येत होती. त्यानंतर वार्षिक पॅटर्न आला व परीक्षा ओएमआर शीट पद्धतीने झाली. 2020 पासून परीक्षा ऑनलाइन होत आहे. विविध पॅटर्नचे विद्यार्थी असल्याने त्याबाबतचे नियोजन करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या आता त्या दूर करण्यात आल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com