IT Jobs : फ्रेशर्ससाठी मोठी बातमी!! टेक महिंद्रा देणार तब्बल 6 हजार नोकऱ्या

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी (IT Jobs) टेक महिंद्राने फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी कंपनी तब्बल 6000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. एकीकडे अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरू असून नवीन भरतीची शक्यता मावळली आहे; तर दुसरीकडे टेक महिंद्राने फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

आयटी कंपनीचे हे दुसरे आर्थिक वर्ष आहे (IT Jobs) ज्यामध्ये या वर्षभरात कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. यापूर्वी, कंपनीने आर्थिक वर्ष 2018 मध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याची माहिती दिली होती. टेक महिंद्रा व्यतिरिक्त, आत्तापर्यंत फक्त TCS ने सांगितले आहे की ते आर्थिक वर्ष 2025 मध्ये सुमारे 40,000 फ्रेशर्सना नियुक्त करण्याची योजना आखत आहेत.

टेक महिंद्राचे एमडी आणि सीईओ (IT Jobs) मोहित जोशी म्हणाले; “कर्मचाऱ्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. आम्ही सतत नवीन पदवीचे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नियुक्त करत आहोत.” ते पुढे म्हणाले; “आम्ही नवीन चीफ लर्निंग ऑफिसर अंतर्गत या नवीन लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी एक कार्यक्रम देखील तयार करत आहोत. आम्ही नवीन फ्रेशर्सची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात आहोत.”

‘या’ कंपन्यांमध्ये झाली कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट (IT Jobs)
आर्थिक वर्ष 2024 मध्ये, TCS, Infosys आणि Wipro या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घसरण झाली आहे. TCS आणि इन्फोसिसमध्ये गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. 2023-2024 या आर्थिक वर्षात TCS मध्ये 13,249 कर्मचारी, Infosys मध्ये 25,994 आणि Wipro मध्ये 24,516 कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com