करिअरनामा ऑनलाईन । ISRO ने AI तसेच मशीन लर्निंग कोर्स (ISRO Free Course) तयार केले आहेत. विशेष म्हणजे हे कोर्स पूर्णपणे मोफत असणार आहेत. AI तसेच मशीन लर्निंगविषयी जाणून घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. ज्यांना AI तसेच मशीन लर्निंग शिकायचे आहे अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित रजिस्टर करायचं आहे कारण सीट्स मर्यादित आहेत.
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने भारताचे नाव जगभरात पोहचवले आहे. भारताचा झेंडा चंद्रावर तसेच मंगळावर डौलाने फडकत आहे; याचे सर्व श्रेय ISRO ला आणि तेथील (ISRO Free Course) वैज्ञानिकांना जाते. दिवसेंदिवस तंत्रज्ञानात विकसीत हॉट असताना रोज नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. आर्टीफिशीअल इंटेलिजन्सच्या (AI) या जगामध्ये गोष्टी अगदी सोप्या बनून गेल्या आहेत. अद्याप अनेक जणांना AI बद्दल फारशी माहिती नाही, पण जे AI बद्दल सगळंकाही जाणून आहेत, त्यांच्यासाठी अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत.
ISRO ने लाँच केले मोफत कोर्स (ISRO Free Course)
जर तुम्ही AI तसेच मशीन लर्निंगबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असाल तर ISRO ने तुमच्यासाठी मोठी संधी घेवून येत आहे. ISRO ने दि. १९ ऑगस्ट २०२४ ते २३ ऑगस्ट २०२४ दरम्यान कोर्स लाँच केले आहे, जे पूर्णपणे मोफत शिकता येणार आहेत. या कोर्समध्ये ISRO ची तज्ज्ञ मंडळी AI आणि मशीन लर्निंगबद्दल माहिती देणार आहेत. ISRO सारख्या संशोधन संस्थेतील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन लाभणे ही फार मोठी गोष्ट आहे.
कोर्ससाठी इथे करा रजिस्टर
5 दिवसांचा AI तसेच मशीन लर्निंग कोर्स पूर्णपणे मोफत असणार आहे. जर तुम्हाला या कोर्ससाठी रजिस्टर करायचे असल्यास प्रथम https //elearning.iirs.gov.in/edusatregistration या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. रजिस्ट्रेशन विंडो सुरु झाली असून कोर्ससाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत; त्यामुळे इच्छुक लोकांनी लवकरात लवकर रजिस्टर करायचे आहे. ज्या उमेदवाराची एकूण हजेरी ७०% असेल, त्याला ISRO मार्फत प्रमाणपत्रही देण्यात येईल. हे प्रमाणपत्र लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (LMS) येथे उपलब्ध असेल; येथूनच उमेदवार आपले प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com