करिअरनामा ऑनलाईन । दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय (Israel-Hamas News) पाश्चिमात्य देशात नोकरीसाठी जातात. इस्राइलमध्ये नोकरीसाठी जाणारे भारतीय देखील मोठ्या प्रमाणात आहेत. इथे IT क्षेत्रात नव्हे तर एका वेगळ्याच जॉबसाठी भारतीयांना खूप मोठी मागणी आहे. या कामाच्या मोबदल्यात भारतीयांना पगार देखील भरघोस दिला जातोय. येथे येवून तुम्हाला ‘केअरगिव्हर’चे काम करायचं आहे. हे काम कसं असेल; यासाठी पगार किती मिळतो हे आज आपण पाहणार आहोत.
वृध्द लोकांसाठी कुटुंबाला वेळ नाही
आपण पाहतो की, लोकांकडे जसे पैसे जास्त येतील; तसं ते आधुनिक होतात. परिणामी त्यांच्याकडे कुटुंबाला देण्यासाठी वेळ उरत नाही. अमेरिका, जपान या देशांसह इस्राइलला देखील ही गोष्ट लागू पडते. इस्राइलमध्ये सध्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडे वेळ नाही. येथील लोकांकडे पैसे आहेत पण वेळ नाही. त्यामुळे या लोकांना त्यांच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सेवा शुश्रूषेसाठी नर्सेसची गरज भासते. आपल्या घरातील ज्येष्ठांना सांभाळण्यासाठी तेथे भारतीय लोकांची मागणी वाढत आहे. त्यांना हे ‘केअरगिव्हर’ त्यांच्या घरातील ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी हवे असतात.
काय आहे काम (Israel-Hamas News)
इस्राइलमध्ये जेष्ठ नागरिकांची लोकसंख्या खूप वाढली आहे. युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक कमिशन फॉर युरोपच्या मते इस्राइलमध्ये साल 1950 नंतर 65 वयानंतरच्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. इथल्या घरामधील वृध्द व्यक्तींच्या देखभालीसाठी इस्राइल कुटुंबे ‘केअरगिव्हर’ भाड्याने घेत आहेत. यात भारतीय ‘केअरगिव्हर’ना जास्त मागणी आहे. भारतीयांमधील संयम आणि व्यावसायिक कौशल्य गुणांमुळे ते भारतीय लोकांना पहिली पसंती देतात. सध्या येथे 14 हजार भारतीय हेच काम करीत आहेत.
मिळतो इतका पगार
इस्राइलमध्ये इंडीयन केअरगिव्हरना खूप मागणी आहे. त्यांना येथे सव्वा लाख ते तीन लाखापर्यंत पगार देण्यात येतो. येथे प्रत्येक तासाला किमान 900 रु.पगार दिला जातो. यासोबत राहण्याचा आणि खाण्याचा खर्च वेगळाच. शिवाय वैद्यकीय खर्चही मिळतो. येथे केवळ शुक्रवार दुपार ते शनिवार (Israel-Hamas News) दुपारपर्यंत सुटी मिळते. इतर देशांसाठी केअर गिव्हरसाठी नर्सिंगमध्ये ग्रॅज्युएशन आवश्यक असते. परंतू भारतीयांना यामध्ये सूट आहे. येथे त्यांना संवादासाठी केवळ हिब्रु भाषा शिकविण्यात येते. इतर देशात कोणत्याही देशात इंग्रजी भाषा येने गरजेचे असते. येथे तसे नाही. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक भारतीय येथे नोकरीला आहेत.
काही दिवसापूर्वी इस्राइलवर पॅलेस्टाईनची अतिरेकी संघटना हमासने हल्ला केल्याने तेथे राहणारे भारतीय देखील संकटात आले आहेत. हे युद्ध जर लांबले तर (Israel-Hamas News) भारतीयांना देशात आणण्यासाठी वेगळी मोहिम राबवावी लागणार आहे. त्यामुळे तेल अवीव स्थित भारतीय दूतावास आता सतर्क झाला आहे. भारतीय नागरिकांना सुरक्षेचे आश्वासन दिले असून भारतीय दुतावासाने नागरिकांना कायम संपर्कात रहाण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com