करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा (IPS Success Story) उत्तीर्ण होणे हे अनेक युवकांचे स्वप्न असते. तर काहींच्या पालकांनाही आपल्या मुलांनी आयएएस (IAS), आयपीएस (IPS) आणि इतर नागरी सेवक बनवायची इच्छा असते. या लेखात, आम्ही तुम्हाला IPS अधिकारी स्वीटी सहरावतच्या आयुष्याबद्दल सांगणार आहोत; जीने 2019 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
वडिलांच्या इच्छेसाठी डिझाइन इंजिनीअरची नोकरी सोडली
IPS स्वीटी सहरावत ही बिहार केडरची अधिकारी आहे जिने ऑल इंडिया रँक (AIR) 187 सह UPSC उत्तीर्ण केली आहे. सध्या ती औरंगाबाद, बिहार येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक (ASP) म्हणून कार्यरत आहे. आईएएस अधिकारी बनण्याचे तिच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने डिझाइन इंजिनीअरची नोकरी सोडली होती. तिने दिल्लीच्या तंत्रज्ञान विद्यापीठातून B.Tech (ECE) पदवी घेतली आहे. तिचे वडील दिल्ली पोलीसात हेड कॉन्स्टेबल होते ज्यांचा 2013 मध्ये अपघाती मृत्यू झाला होता.
राज्यपालांना घरी भेटण्यास दिला नकार (IPS Success Story)
केरळचे माजी राज्यपाल आणि सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी निखिल कुमार यांच्याशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आयपीएस स्वीटी सहरावत सध्या चर्चेत आहे. मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेले निखिल कुमार स्वीटी सेहरावत यांच्या घरी गेले होते. जेव्हा ते स्वीटी सहरावतच्या दाणी बिघा येथील निवासस्थानी (IPS Success Story) पोहोचले तेव्हा सुरक्षा कर्मचार्यांनी त्यांना वाट पाहण्यास सांगितले; कारण ती घरी दैनंदिन काम उरकत होती. तिने कुमार यांना ऑफिसमध्ये भेटायला सांगितले. वारंवार विनंती केल्यानंतर अखेर स्वीटी सहरावत माजी राज्यपालांना भेटण्यास तयार झाली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर लोकांनी दोन प्रकारची मते व्यक्त केली आहेत. काहीजण स्वीटी सेहरावतचे समर्थन करत आहेत आणि म्हणतात की तिला तिच्या घरी वैयक्तिक (IPS Success Story) आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. तर दुसरा विभाग असा दावा करतो की पोलीस अधिकाऱ्यांनी 24×7 ड्युटीवर असणं आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com