Infosys News : कर्मचाऱ्यांचे Work From Home करणार बंद; Infosys चा मोठा निर्णय

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना काळात लॉकडाउनमुळे जगातील (Infosys News) जवळपास सर्व  कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा दिली होती. अजूनही काही कर्मचारी वर्क फ्रॉम होम सुविधेचा फायदा घेत आहेत. तर दुसरीकडे कोरोना आटोक्यात आल्याने अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्यास सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध IT कंपनी Infosys आपल्या कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. Infosys सध्या कर्मचाऱ्यांची वर्क फ्रॉम होमची सुविधा बंद करण्याचा विचार करत आहे.

कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करायचे असेल तर त्यांना त्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागेल; असे Infosysने सांगितले आहे. तसेच जे कर्मचारी वर्क फ्रॉम होमच्या (Infosys News) नवीन नियमांनुसार काम करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कंपनी शिस्तभंगाची कारवाई करेल; असा इशाराही इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना दिला आहे. मात्र कंपनीचा हा आदेश आणि हे नवे नियम फक्त अमेरिका आणि कॅनडातील कर्मचार्‍यांसाठीच लागू आहेत. भारतात काम करणाऱ्या इन्फोसिस कर्मचार्‍यांसाठी मात्र कंपनीने अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत.

टाटानेही घेतला होता निर्णय – (Infosys News)
यापूर्वी टाटा समूहाच्या टीसीएस कंपनीने सुद्धा कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याचा उलटाच परिणाम पाहायला मिळाला. ऑफीसवर कामाला जाणे शक्य नाही असं म्हणत अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला, यामध्ये खास करून महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com