Indian Railway Recruitment 2022 : बंपर भरती!! रेल्वेत 5 हजारांहून अधिक पदांवर होणार भरती, त्वरा करा…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | रेल्वेत नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी (Indian Railway Recruitment 2022) आनंदाची बातमी आहे. रेल्वेत 5 हजाराहून अधिक पदांवर बंपर भरती करण्यात येणार आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेनं शिकाऊ पदांवर (Aparentis) भरतीची अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार एनएफआरच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

या रिक्त पदांवर होणार भरती –

  1. या भरती अंतर्गत कटिहार (KIR) आणि टीडीएच (TDH) कार्यशाळेसाठी 919 पदे
  2. अलीपुरद्वारसाठी (KIR) 522 पदे
  3. रंगिया येथे (RNY) 551 पदे
  4. लुमडिंगसाठी 1140 पदे
  5. तिनसुकियासाठी 547 पदे
  6. न्यू बोंगाईगाव कार्यशाळेसाठी 1,110 पदे, आणि दिब्रुगड कार्यशाळेसाठी 847 पदे भरण्यात येणार आहेत.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

आवश्यक पात्रता – (Indian Railway Recruitment 2022)

  1. उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
  2. यासोबतच अर्जदाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा –

उमेदवाराचं वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावं.

अशी होईल निवड –

गुणवत्तेच्या आधारावर या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. (Indian Railway Recruitment 2022)

अर्ज फी –
अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराला या भरतीसाठी 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com