Indian Postal Department Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी पोस्ट खात्यात नोकरीची मोठी संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या टपाल विभागात (Indian Postal Department Recruitment 2024) नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. भारतीय टपाल विभाग अंतर्गत स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी) पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 45 दिवसाच्या आत इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची ही उत्तम संधी समजली जाते. जाणून घेवूया भरती विषयी सविस्तर….

संस्था – टपाल विभाग, भारत (Indian Postal Department)
भरले जाणारे पद – स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी)
पद संख्या – 19 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवस
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य पोस्टमास्टर जनरल ऑफिस, बिहार सर्कल, पाटणा-800001
वय मर्यादा – 56 वर्षे (Indian Postal Department Recruitment 2024)
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10 वी पास
मिळणारे वेतन – Pay Matrix Level 01 as per 7th CPC

असा करा अर्ज – (Indian Postal Department Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 45 दिवस आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com