Indian Post Recruitment 2024 : 10वी पास उमेदवारांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी; महिन्याचा 63,200 एवढा पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Indian Post Recruitment 2024) तरुणांसाठी भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय डाक विभागाकडून नवीन भरती राबवली जात आहे. या भरतीच्या माध्यमातून ड्राइवर (साधारण ग्रेड) पदाच्या 78 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

विभाग – भारतीय डाक विभाग
भरले जाणारे पद – ड्राइवर (साधारण ग्रेड)
पद संख्या – 78 पदे (Indian Post Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. त्याच्याकडे Driving License+ हलके आणि जड वाहन चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे (Indian Post Recruitment 2024)
परीक्षा फी – 100 रुपये/-
मिळणारे वेतन – 19,900/- ते 63,200/- रुपये दरमहा

अशी होईल निवड –
स्टेज 1 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्टेज II साठी उपस्थित राहावे लागेल. जे उमेदवार स्टेज II च्या प्रत्येक पेपरमध्ये पात्र ठरतील त्यांना अंतिम गुणवत्ता यादीमध्ये उपस्थित रहावे लागेल.
नोकरीचे करण्याचे ठिकाण – कानपूर (उत्तर प्रदेश)
काही महत्वाच्या लिंक्स – (Indian Post Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com