Indian Post GDS Recruitment 2024 : भारतीय टपाल विभागात 44,228 पदांवर बंपर भरती; 10 वी पास करु शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Indian Post GDS Recruitment 2024) देशातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभाग अंतर्गत ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांच्या एकूण 44,228 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. विशेष म्हणजे 10 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. या उमेदवारांसाठी भरतीची मोठी संधी असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर.

संस्था – भारतीय टपाल विभाग
भरले जाणारे पद – ग्रामीण डाक सेवक
पद संख्या – 44,228 पदे (Indian Post GDS Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – Rs.10,000/- ते 29, 380/- दरमहा
असा करा अर्ज – (Indian Post GDS Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
5. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com