Indian Navy : भारतीय नौदलाचा ऐतिहासिक निर्णय; महिलांना स्पेशल फोर्समध्ये सामावून घेणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदलाने इतिहासात प्रथमच महिलांना (Indian Navy) स्पेशल फोर्समध्ये सामील होण्याची परवानगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे आता महिलाही उच्चभ्रू स्पेशल फोर्समध्ये सामील होऊ शकणार आहेत. हा असा उपक्रम आहे, ज्याद्वारे प्रथमच महिला तिन्ही सैन्यात कमांडो म्हणून काम करू शकणार आहेत.

या निर्णयाची माहिती असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तिन्ही सैन्यदलांमध्ये महिला आधीच वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत तिचे कमांडो होणे हे देशातील महिला सक्षमीकरणासाठी एक नवे पाऊल ठरेल. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या स्पेशल (Indian Navy) फोर्समध्ये काही उत्तम सैनिकांचा सहभाग असतो. त्यांना कठोर प्रशिक्षणातून जावे लागते. स्पेशल फोर्सेसच्या या कमांडोमध्ये कोणत्याही परिस्थितीत वेगाने काम करण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळेच त्यात सुरुवातीपासून केवळ पुरुषांनाच स्थान दिले जात होते. मात्र आता महिलाही पुरुषांपेक्षा मागे नाहीत त्यामुळे महिलांनाही सामील करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नौदलातील महिला आता मरीन कमांडो (मार्कोस) बनू शकणार आहेत. भारतीय लष्करी इतिहासातील हा खरोखरच गौरवशाली क्षण आहे. परंतु स्पेशल फोर्सेसच्या तुकडीकडे थेट कोणालाही पाठवले जात नाही. यासाठी लोकांनी स्वतः पुढे यावं लागेल असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

कोण असतात मार्कोस कमांडो (Indian Navy)

मार्कोस कमांडोंना अशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाते की ते समुद्र, आकाश आणि जमीन या तिन्ही मोहिमा पार पाडू शकतात. हे कमांडो शत्रूची जहाजे, त्यांचे तळ आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात माहिर असतात. या कमांडोंचे प्रशिक्षण अशा प्रकारे दिले जाते की ते नौदलाला (Indian Navy) मदत करताना टोही मोहीम राबवतात. सागरी परिस्थितीत दहशतवाद्यांशी लढण्यातही त्यांना निपुण करण्यात येते. काश्मीरमधील वुलर लेक परिसरात दहशतवादविरोधी कारवाईसाठी मार्कोस कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

महिलांना आता जमीन, पाणी, हवेतही देशसेवा करण्याची मोठी संधी मिळणार आहे. नौसेना यासाठी मोठी पावलं उचलत आहे. त्यामुळे महिलांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com