Indian Navy Recruitment 2024 : ‘या’ उमेदवारांना इंडियन नेव्हीमध्ये भरती होण्याची मोठी संधी; ऑनलाईन करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात (Indian Navy Recruitment 2024) असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. भारतीय नौदल अकादमी अंतर्गत नागरी (Gropu B&C) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 741 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर….

संस्था – भारतीय नौदल अकादमी
भरले जाणारे पद – नागरी (गट – बी आणि सी)
पद संख्या – 741 पदे (Indian Navy Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑगस्ट 2024

अर्ज फी –
1. जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु. 295/-
2. SC/ST/PWD/ESM/स्त्री – फी नाही
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्यासाठी (Indian Navy Recruitment 2024) खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
5. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com