करिअरनामा ऑनलाईन । देशातील अनेक तरुणांना (Indian Merchant Navy Recruitment 2024) मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळवून लाईफ सेट करण्याचं अनेकांचं ध्येय असतं. या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. मर्चंट नेव्हीने विविध विभागांसाठी पात्र उमेदवारांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत घोषणेनुसार, ही भरती मोहीम डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सी मॅन आणि कुक या पदांच्या भरतीसाठी राबवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार https://sealanemaritime.in वर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन पोर्टलद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना 30 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येईल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत आवश्यक फी सह अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी; असं आवाहन करण्यात आलं आहे. जाणून घेवूया या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर…
पात्रता निकष असे आहेत –
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेचे 10वी आणि 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय, तुम्ही अर्जाच्या वेबसाइटवरून पात्रतेबाबत अधिक तपशील मिळवू शकता.
अर्ज फी –
सर्व पदांसाठी अर्ज शुल्क समान आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, उमेदवारांना ऑनलाइन मोडद्वारे 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
आवश्यक वय मर्यादा –
मर्चंट नेव्ही भर्ती 2024 साठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी वयाचे काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. या पदांसाठी किमान वयाची अट 17.5 वर्षे आहे, तर कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे. 30 एप्रिल 2024 रोजी वयाची गणना केली जाईल. याव्यतिरिक्त, SC आणि ST उमेदवार सरकारी नियमांनुसार वय शिथिलतेसाठी पात्र आहेत.
मिळणारे वेतन – (Indian Merchant Navy Recruitment 2024)
डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सी मॅन आणि कुक यासह इतर अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. निवड झाल्यावर, उमेदवारांना पदानुसार 3500 ते 5500 रुपये या प्रमाणात मासिक वेतन मिळेल.
परीक्षेची तारीख – परीक्षेची नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, अधिकृत अधिसूचनेनुसार, भरती प्रक्रिया 2024 मध्ये होणार आहे. (Indian Merchant Navy Recruitment 2024)
भारतीय मर्चंट नेव्ही भरती मोहीम पात्र आणि इच्छुक उमेदवारांना विविध विभागांमध्ये सामील होण्याची संधी देत आहे. उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी त्यांचे अर्ज सादर करून आगामी भरती प्रक्रियेची तयारी करावी; असं आवाहन करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com