IITM Recruitment 2024 : IITM अंतर्गत पुण्यात नोकरीची संधी; जाणून घ्या भरतीची संपूर्ण प्रक्रिया

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी आपले अर्ज tropmet.res.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी या भरतीचा फायदा होणार आहे. अनेक तरुणांना पुण्यात नोकरी मिळवायची असते; अशा तरुणांना या (IITM Recruitment 2024) भरतीचा फायदा होणार आहे. या माध्यमातून कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच पद संख्या, आवश्यक वय मर्यादा, आवश्यक पात्रता, अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

संस्था – भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था
भरले जाणारे पद – (IITM Recruitment 2024)
1. रिसर्च असोसिएट
2. रिसर्च फेलो
पद संख्या – 30 पदे
रिक्त जागांचा तपशील – 30 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम सुरू आहे. त्यापैकी 10 रिक्त जागा रिसर्च असोसिएट पदासाठी; तर 20 रिक्त जागा रिसर्च फेलो पदासाठी आहेत.

नोकरीचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – रिसर्च असोसिएटसाठी उमेदवाराचे वय २५ वर्षे आणि रिसर्च फेलो या पदासाठी उमेदवाराचे वय २८ वर्षे असावे.

असा करा अर्ज –
1. प्रथम tropmet.res.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. होम पेजवर आयआयटीएम रिसर्च असोसिएट आणि रिसर्च फेलो या पदासाठी PER/04/2024 या जाहिरातीवर क्लिक करा.
3. स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल.
4. नंतर Apply लिंकवर क्लिक करा.
5. फॉर्म भरा. (IITM Recruitment 2024)
6. सर्व आवश्यक माहिती कागदपत्रे अपलोड करा.
7. अर्ज फी भरा.
8. पुढील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com