करिअरनामा ऑनलाईन। देशातील कोणत्याही IIT कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा म्हटलं की JEE ची परीक्षा देणं (IIT Madras) आवश्यक असतं. JEE mains आणि JEE Advance परीक्षा उत्तीर्ण केल्यानांतरच तुम्हाला IIT ला प्रवेश मिळू शकतो. मात्र आता देशातील एका IIT नं असे काही भन्नाट कोर्सेस आणले आहेत की तुम्हाला त्यासाठी JEE परीक्षा देण्याची काहीच गरज पडत नाही.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIT मद्रासने 4 वर्षांचा B.Sc डेटा सायन्स कोर्स जाहीर केला आहे. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी JEE स्कोअर आवश्यक नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना JEE शिवाय आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी आहे. IIT मद्रासने 1 ऑगस्ट रोजी या अभ्यासक्रमाची माहिती दिली आहे. ज्यासाठी 12 वी पास विद्यार्थी अर्ज करू शकतात. याबाबतची अधिसूचना अधिकृत वेबसाइट onlinedegree.iitm.ac.in वर देण्यात आली आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – (IIT Madras)
या कोर्ससाठी सप्टेंबरच्या टर्मसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 19 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे.
विद्यार्थी onlinedegree.iitm.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन कोर्ससाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
काय असेल पात्रता –
या अभ्यासक्रमासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार कोणत्याही शाखेचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात.
दहावीत इंग्रजी आणि गणित हे दोन विषय असावेत.
सध्या 13000 हून अधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. (IIT Madras)
त्यापैकी सर्वाधिक विद्यार्थी तामिळनाडू, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील आहेत.
यासाठी देशातील 111 शहरांमधील 116 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाते.
यूएई, बहरीन, कुवेत आणि श्रीलंका येथेही हीच परीक्षा केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com