IIT जम्मूच्या विद्यार्थ्याने सांगितले यशाचे मार्ग; IIT JEE च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आपण आपल्या जीवनात बरीच छोटी आणि मोठी उद्दीष्टे ठेवली असतात जी, आपण पूर्ण करतो. पण, स्वतःचे सर्वात मोठे ध्येय साध्य होईपर्यंत आपण पूर्णपणे समाधानी नसतो. त्या मोठ्या ध्येयासाठी आपण कठोर परिश्रम करायलाच पाहिजे यात दुमत नाही. पण, त्या मागे धावताना आपण आपल्या निर्धारित स्थानावर जाण्यासाठी सर्वात प्रेरणा देणाऱ्या छोट्या-छोट्या यशांकडेही दुर्लक्ष करता कामा नये. अशाच एका विद्यार्थ्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्याने प्रचंड कष्ट घेऊन यश संपादन केले. जयंत देव गोयल हे आयआयटी जम्मूचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत. लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थी आहेत. 8वी ते 10वी पर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय गणित ओलंपियाड उत्तीर्ण केले आहेत. सन 2017 मध्ये त्यांनी आयआयटी जेईई परीक्षा दिली. आणि IIT जम्मूला त्यांचा प्रवेश झाला.

IIT जम्मू तेथे शिकताना त्यांनी बर्‍याच कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. आणि अनेक कार्यक्रम स्वत: आयोजित केले. तेथून व्यवस्थापनाच्या क्षमतेविषयीही त्यांना माहिती मिळाली आणि त्यानंतर जयंत यांनी कॅट 2020 आणि आयआयएफटी 2021 मध्ये क्रॅक केली. प्रथम ऑलिम्पियाड नंतर दहावी आणि बारावी बोर्ड, नंतर आयआयटी आणि कॅट या सर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, जयंतने हे सिद्ध केले की योग्य ध्येयासह तयारी करताना यश निश्चितच आपल्या चरणांचे चुंबन घेते. आयआयटी जेईईसाठी तयारी करणाऱ्या तरुणांना आपले अनुभव सांगण्यासाठी एक खास सत्र ठेवले होते.

IIT JEE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तयारीच्या दृष्टीकोनातून हे सत्र खूप खास ठरणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना खास तयारीच्या युक्त्या सांगितल्या गेल्या आहेत. तसेच योग्य तयारीच्या धोरणाच्या निर्धाराबद्दलही सांगितले आहे. या विशेष सत्राचा एक भाग होऊ शकता आणि आपली आयआयटी जेईई तयारी सुरू करु शकता. saflta class या YouTube चॅनेलला भेट द्या. YouTube Link या लिंकवर जाऊन आपण ते विडिओ पाहू शकता. IIT JEE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा चांगला फायदा ठरू शकतो.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com