जिंकली!!! जगातील 1 लाख स्पर्धकांना मागे टाकत IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यानं जिंकली जागतिक कोडिंग स्पर्धा; मिळालं US$ 10 हजारचं बक्षिस

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारत हा असा देश आहे जो इतर देशांच्या तुलनेत विकसनशील असला तरी इथल्या तरुणांमध्ये कमालीचा आत्मविश्वास आणि जग जिंकून घेण्याची ताकद आहे. म्हणून आज जगभरातील टॉप कंपन्यांच्या CEO पदी काही भारतीय आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे जगावर राज्य करण्याची तयारी आहे. असंच एक नाव आहे कलश गुप्ता. कलशने जगातील सर्वात मोठ्या कोडिंग स्पर्धेत भाग घेत जगभरातून पहिला क्रमांक पटकावला आहे.

जगातील सर्वात मोठी कोडींग स्पर्धा जिंकून देशाच्या या सुपुत्राने जगात भारताचा झेंडा फडकावला आहे. खरं तर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस दरवर्षी जागतिक प्रोग्रामिंग स्पर्धा आयोजित करते. ज्यामध्ये IIT दिल्लीचा विद्यार्थी कलश गुप्ता ‘TCS CodeVita’ सीझन 10 चा विजेता घोषित करण्यात आला आहे.

हि स्पर्धा जिंकल्यानंतर कलश गुप्ताला US$ 10,000 ची रक्कम बक्षीस देण्यात आली आहे. कलश हा IIT दिल्लीतील कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे.

या स्पर्धेत 87 देशांतील एक लाखाहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेची जगातील सर्वात मोठी संगणक प्रोग्रामिंग स्पर्धा म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. कलश नंतर, प्रथम आणि द्वितीय उपविजेते अनुक्रमे चिली आणि तैवानचे विद्यार्थी आहेत. IIT दिल्लीचे संचालक रंगन बॅनर्जी यांनी कलश गुप्ता यांच्या विजयानंतर त्याचा गौरव केला आहे.

हा एक अद्भुत अनुभव

जिंकल्यानंतर कलश गुप्ता म्हणाला की, “जेव्हा मी स्पर्धेला सुरुवात केली तेव्हा मला कधीच वाटले नव्हते की मी टॉप 3 मध्ये येईन, परंतु जिंकण्याचा हा एक अद्भुत अनुभव आहे. सुरुवातीला, समस्या सोडवण्यास मला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला, परंतु मी इतर काही समस्या सोडवून पुढे जात असताना, मला माझ्या अंतिम स्थानावर पोचताना अधिक आत्मविश्वास वाटला आणि मला वाटले की मी पहिल्या 3 मध्ये येईन.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com