करिअरनामा ऑनलाईन । आयआयएम इंदूरमध्येही नुकतीच कॅम्पस (IIM Indore) प्लेसमेंट झाली. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे नोकरीसाठी निवड केली जाते. या प्लेसमेंटमध्ये एक-दोन नाही तर तब्बल 12 विद्यार्थ्यांना वार्षिक 1.14 कोटी रुपयांचं पॅकेज मिळालं आहे.
इंदूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधल्या 12 विद्यार्थ्यांना नोकरीसाठी 1.14 कोटी रुपयांचं वार्षिक सॅलरी पॅकेज ऑफर करण्यात आलं आहे. इथल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेशनच्या फायनल प्लेसमेंटदरम्यान ऑफर केलेलं हे सर्वाधिक सॅलरी पॅकेज आहे. यात मागच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 132.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
मागील प्लेसमेंट सेशनमध्ये सर्वाधिक वेतन 49 लाख रुपये एवढं ऑफर करण्यात आलं होतं. या वेळच्या सेशनच्या फायनल प्लेसमेंटदरम्यान 160हून अधिक भारतीय आणि (IIM Indore) परदेशी कंपन्यांनी आयआयएम इंदूरच्या 568 विद्यार्थ्यांना सरासरी 30.21 लाख रुपये वेतन देऊ केलं. जे विद्यार्थी ही ऑफर मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत, त्यात दोन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम (PGP) आणि पाच वर्षांचा इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट (IPM) यांचा समावेश आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम एमबीएच्या समकक्ष मानले जातात.
आयआयएम इंदूरने दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक नोकऱ्यांच्या ऑफर्स म्हणजेच 29 टक्के ऑफर्स कन्सल्टन्सी फिल्डमधून आल्या आहेत. त्यानंतर जनरल मॅनेजमेंट (IIM Indore) व ऑपरेशन्स 19 टक्के, फायनान्स अँड मार्केटिंग प्रत्येकी 18 टक्के आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फिल्डमधून 16 टक्के ऑफर्स आल्या आहेत. दरम्यान, आयआयएम इंदूरच्या IPM सोशल इंटर्नशिपमध्ये, कॅम्पस प्लेसमेंटसाठी निवडलेल्या 122 विद्यार्थ्यांनी तब्बल 127 ऑफर्ससह 100 टक्के प्लेसमेंट रेकॉर्ड मिळवला आहे.
आयआयएम इंदूरच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या फायनल (IIM Indore) सेशनमध्ये खूप चांगलं सॅलरी पॅकेज कंपन्यांनी ऑफर केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा कॅम्पस प्लेसमेंटसाठी निवडलेल्या 122 विद्यार्थ्यांना तब्बल 127 ऑफर्स मिळाल्या. म्हणजेच काही विद्यार्थ्यांना दोन ऑफरही मिळाल्या होत्या. अशा रितीने आयआयएम इंदूरने यंदा 100 टक्के प्लेसमेंट रेकॉर्ड नोंदवला आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com