ICSI Exam 2024 : कंपनी सेक्रेटरी परीक्षेचे हॉल तिकीट जारी; असं करा डाउनलोड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज (ICSI Exam 2024) ऑफ इंडियाने कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून 2024 चे हॉल तिकीट प्रसिध्द केले आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट www.icsi.edu ला भेट देऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. कंपनी सेक्रेटरी परीक्षा येत्या दि. 2 ते दि. 10 जून 2024 या कालावधीत होणार आहेत. सकाळी 9 ते दुपारी 12.15 या वेळेत ही परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवारांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी सकाळी 9 ते 9.15 पर्यंत 15 मिनिटांचा वेळ दिला जाईल.

महत्वाची सूचना –
उमेदवारांनी हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर त्यावर दिलेले (ICSI Exam 2024) त्यांचे वैयक्तिक तपशील (नाव, आई/वडिलांचे नाव, जन्मतारीख, फोटो इ.) तपासावेत. यामध्ये काही त्रुटी आढळल्यास सुधारण्यासाठी ताबडतोब ICSI हेल्पलाइनशी [email protected].या मेल आयडी वरून संपर्क साधावा, अशी सूचना ICSI कडून देण्यात आली आहे.

कंपनी सेक्रेटरी परीक्षा येत्या 2 ते 10 जून 2024 या कालावधीत होणार आहेत. सकाळी 9 ते 12.15 या वेळेत ही परीक्षा घेतली जाणार आहे. उमेदवारांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी सकाळी 9 ते 9.15 पर्यंत 15 मिनिटांचा वेळ देण्यात येईल.

हॉल तिकीट असं करा डाउनलोड (ICSI Exam 2024)
1. सर्व उमेदवारांनी प्रथम icsi.edu या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
2. मुख्यपृष्ठावरील ICSI CS जून 2024 प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करा.
3. आपले लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
4. हॉल तिकीट तपासा आणि डाउनलोड करा.
5. पुढील वापरासाठी प्रवेशपत्राची प्रिंट घ्या.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com