ICAI CA Exam 2024 : नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या CA परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाची अपडेट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । चार्टर्ड अकाउंटंट मुख्य परीक्षेचा अभ्यास (ICAI CA Exam 2024) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे . द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट (CA) अंतिम अभ्यासक्रमाच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये ही परीक्षा होणार आहे. संस्थेने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार, सीए फायनलच्या गट 1 च्या परीक्षा 1, 3 आणि 5 नोव्हेंबर रोजी आणि गट 2 च्या परीक्षा 7, 9 आणि 11 नोव्हेंबर रोजी घेतल्या जातील.

नोंदणीसाठी महत्वाच्या तारखा
CA नोव्हेंबर 2024 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याबरोबरच ICAI ने या परीक्षेसाठी आवश्यक नोंदणी तारखा देखील जाहीर केल्या आहेत. संस्थेच्या अधिसूचनेनुसार उमेदवार 7 ऑगस्टपासून सीए फायनल नोव्हेंबर 2024 च्या परीक्षेस बसण्यासाठी त्यांचा परीक्षा फॉर्म भरू शकतील. ज्यासाठी अंतिम तारीख 20 ऑगस्ट ही विलंब शुल्काशिवाय निश्चित करण्यात आली आहे. यानंतर 23 ऑगस्ट रोजी 600 रुपये विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येईल.

परीक्षा फी (ICAI CA Exam 2024) –
ICAI ने CA नोव्हेंबर 2024 च्या परीक्षांसाठी एका गटासाठी 1,800 रुपये शुल्क निश्चित केले आहे. एखाद्या विद्यार्थ्याला गट 1 आणि गट 2 अशा दोन्ही परीक्षांसाठी नोंदणी कराची असेल त्यांना 3,300 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

परीक्षा फॉर्ममधील दुरुस्ती विषयी –
कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा फॉर्ममध्ये दुरुस्तीची आवश्यकता असल्यास यासाठी ICAI द्वारे 24 ते 26 ऑगस्ट या कालावधीत अर्ज दुरुस्ती विंडो उघडली जाईल. या कालावधीत, उमेदवार त्यांच्या परीक्षेचे शहर आणि परीक्षेचे माध्यम बदलू शकतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com