करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सने (ICAI CA Exam 2024) सप्टेंबर 2024 सत्रासाठी CA इंटरमिजिएट परीक्षेसाठी परीक्षा अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. सप्टेंबर सत्राच्या परीक्षा दि. 12 ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. तर सीए इंटर परीक्षा 12 ते 23 सप्टेंबर 2024 या दरम्यान होणार आहे. ही परीक्षा देण्यास इच्छुक असणारे उमेदवार icai.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षा फॉर्म भरू शकतात.
परीक्षे संदर्भात महत्वाच्या तारखा
वेळापत्रकानुसार ICAI – CA फाउंडेशन 2024 ची परीक्षा दि. 13, 15, 18 आणि 24 सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे. ही परीक्षा CA फाउंडेशन 2024 परीक्षा चार्टर्ड अकाउंटंटच्या नियमन 28F अंतर्गत कौन्सिलने अधिसूचित केलेल्या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या अभ्यासक्रमानुसार घेतली जाणार आहे.
सीए इंटर परीक्षा गट 1 साठी 12, 14, 17 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहे. तर गट 2 साठी 19, 21 आणि 23 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार आहे. तसेच 16 सप्टेंबर 2024 रोजी मिलाद उन-नबी या सणामुळे कोणतीही परीक्षा होणार नाही, असे कौन्सिलकडून सांगण्यात आले आहे.
असा करा अर्ज (ICAI CA Exam 2024)
1. उमेदवारांनी सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट icai.org ला भेट द्यावी.
2. त्यानंतर लॉगिन क्रेडेंशियल्सच्या मदतीने साइन इन करावे.
3. अर्ज भरा, यानंतर ऑनलाइन शुल्क भरा.
4. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करावी.
5. फॉर्म सबमिट केल्यानंतर, भविष्यातील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.
उमेदवाराने 1 मे 2024 रोजी किंवा त्यापूर्वी फाउंडेशन कोर्समध्ये नोंदणी केली असणे आवश्यक आहे. परीक्षा फॉर्म भरल्याच्या तारखेनुसार उमेदवाराने CPT मधून फाउंडेशनमध्ये रूपांतरित (ICAI CA Exam 2024) केलेले असणे आवश्यक आहे. उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता 12 वीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा उमेदवाराचे 12वीचे प्रवेशपत्र किंवा निकाल SSP मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com