करिअरनामा ऑनलाईन | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS PO Exam) PO च्या मुख्य परीक्षेबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. या परीक्षेसाठी लवकरच प्रवेशपत्र जारी केले जातील अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळाली आहे. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर, उमेदवार या परीक्षेसाठी त्यांचे प्रवेशपत्र ibps.in वर IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन डाउनलोड करू शकतात.
ही आहे परीक्षेची तारीख
IBPS PO Mains परीक्षेच्या तारखेबद्दल बोलायचे तर, ती 26 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. याची पूर्वपरीक्षा 15 आणि 16 ऑक्टोबरला झाली होती. या परीक्षेचा निकाल 2 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या भरतीद्वारे प्रोबेशनरी ऑफिसरच्या 8432 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
कोणत्या बँकेत किती जागा? (IBPS PO Exam)
कॅनरा बँक – 2500
युनियन बँक ऑफ इंडिया – 2094
बँक ऑफ इंडिया – 535
पंजाब नॅशनल बँक – 500
UCO बँक – 550 (IBPS PO Exam)
पंजाब आणि सिंध बँक – 253
एकूण पदे – 6432
Admit Card असं करा Download
- सर्वप्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाइटला ibps.in वर भेट द्या.
- यानंतर तुम्हाला होम पेजवर IBPS PO Mains Exam 2022 Admit Card लिंकवर क्लिक करावे लागेल.
- त्यावर क्लिक करताच तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. (IBPS PO Exam)
- तुम्हाला येथे नोंदणी क्रमांक आणि पासवर्डद्वारे लॉग इन करावे लागेल.
- लॉग इन करताच, उमेदवार IBPS PO मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 2022 लिंक दिसेल .
- इथून तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि त्याची प्रिंट काढू शकतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com