करिअरनामा ऑनलाईन | आयबीपीएस मार्फत घेण्यात येणारी क्लर्क परीक्षेचा निकाल लागला आहे. आपण परीक्षा दिली असल्यास तो निकाल पाहू शकता. सोबतच काही दिवसावर आलेल्या मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्रही वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता.
मागील वर्षी 1 सप्टेंबर 2020 रोजी ibps-clerk-x परीक्षेचे फॉर्म सुटले होते. यानंतर 05 डिसेंबर 2020 पासून 13 डिसेंबर 2020 पर्यंत आयबीपीएस- क्लर्कची पूर्व परीक्षा झाली. निकाल हा पंधरा ते वीस दिवसात येत असतो. पण यावेळी निकालासाठी तब्बल अडीच महिने विद्यार्थ्यांना वाट पहावी लागली. यासोबतच मुख्य परीक्षेला दिवस कमी बाकी असल्यामुळे, मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्रही लगेच उपलब्ध करून दिले गेले आहे.
निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा रोल नंबर किव्वा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारिख तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. खाली निकाल आणि मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र पाहण्यासाठी लिंक देत आहोत.
निकाल डाऊनलोड करण्याची लिंक : ibps.in/crp-clerical-cadre-x/http://ibps.in/crp-clerical-cadre-x/
मुख्य परीक्षा प्रवेशपत्रासाठी लिंक: ibps.in/crp-clerical-cadre-x/
मुख्य परीक्षा दिनांक: 28 फेब्रुवारी 2021