पदवीधारकांना IB मध्ये नोकरीची सुवर्ण संधी; 2 हजार पदांची भरती, पगार 1,42,400 रुपये अधिक भत्ता

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनाम ऑनलाईन । देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ पदवी घेतलेल्या युवकांसाठी नोकरीची एका मोठी संधी आहे. देशाच्या इंटेलिजेंस ब्यूरो (Intelligence Bureau) मध्ये मोठी पद भरती होणार आहे. गृह मंत्रालयाने (Home Ministry, MHA) यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहेत. असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, ग्रेड-२ (ACIO) च्या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. आयबीद्वारे यासाठी एसीआयओ परीक्षा (IB ACIO Exam) घेतली जाईल. या भरतीची माहिती खाली देण्यात येत आहे. याचबरोबर नोटिफिकेशन आणि ऑनलाईन अर्जासाठी डायरेक्ट लिंक खाली देण्यात येत आहेत.

पदाचे नाव- असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, ग्रेड-२ (ACIO)
एकूण जागा – 2000
आरक्षण-
जनरल – 989
आर्थिक दुर्बल गट 113
ओबीसी – 417
एससी – 360
एसटी – 121

पे स्केल – भारत सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. 44,900 रुपये ते 1,42,400 रुपये प्रति महिना पेस्केल असणार आहे. याशिवाय केंद्रीय भत्ते, विशेष सुरक्षा भत्ते आणि अन्य भत्तेदेखील दिले जाणार आहेत.

शिक्षणाची अट
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. कॉम्पुटरची माहिती असावी.
वय – 18 ते 27 वर्षे असायला हवे. आरक्षित वर्गासाठी वयात 5 वर्षांची सूट दिली जाईल.

अर्ज कसा कराल?
या भरतीच्या परिक्षेत बसण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर mha.gov.in किंवा ncs.gov.in वर ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2021 रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 19 डिसेंबरपासून सुरु झाली आहे.

डायरेक्ट लिंक्स
IB ACIO Job Notification 2020 साठी इथे क्लिक करा…

IB ACIO Exam 2020 Apply साठी इथे क्लिक करा…

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’