IAF Agniveer Result 2022 : एअरफोर्स अग्निवीर भरती परीक्षेचा निकाल जाहीर, असा चेक करा निकाल

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय वायुसेनेने (IAF) अग्निवीर भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. त्यांच्या (IAF Agniveer Result 2022) वेबसाइटवर हा निकाल पाहता येणार आहे. परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार अग्निवीर निकाल डाउनलोड करू शकतात आणि त्यांचं सिलेक्शन स्टेटस चेक करु शकतात. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

याशिवाय, उमेदवार https://agnipathvayu.cdac.in/avreg/controller या लिंकवर क्लिक करून त्यांचा निकाल थेट पाहू शकतात. 24 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीत ऑनलाइन झालेल्या अग्निवीर वायू इंटेक 01/2022 साठी STAR 01/2022 चा निकाल अपलोड करण्यात आला आहे आणि तो वैयक्तिक उमेदवाराच्या लॉगिनमध्ये पाहिला जाऊ शकतो. तसेच, SMS आणि सर्व निवडलेल्या उमेदवारांना ईमेल पाठवला जात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

थोडक्यात महत्वाचं – (IAF Agniveer Result 2022)

  • भारतीय हवाई दलाने 24 जुलै 2022 रोजी ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत परीक्षा घेतली होती.
  • IAF परीक्षेत लाखो उमेदवारांनी भाग घेतला.
  • परीक्षेतील शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना 01 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या PSL फेरीसाठी बोलावले जाईल.
  • उमेदवारांचे नामांकन 11 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे.

IAF अग्निवीर निकाल असा डाउनलोड करा –

  1. IAF अग्निपथच्या अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in. वर जा.
  2. IAF Agniveer Result 2022 लिंकवर क्लिक करा.
  3. आता तुमचा ईमेल आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा टाका.
  4. तुमचा IAF अग्निवीर निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.
  5. IAF अग्निवीर निकाल 2022 डाउनलोड करा आणि सेव्ह करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com