करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (HSC SSC Board Exam Results) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत तर इयत्ता दहावीचा केवळ एक पेपर शिल्लक आहे. यावर्षी वेळेत निकाल लावण्याचा बोर्डाचा प्रयत्न आहे. या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्यातच परीक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम करून घेण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे.
पेपर तपासणीचे काम वेगाने सुरु
सध्या बोर्डाकडून पेपर तपासणीचे काम वेगाने सुरू आहे. बारावीचे (HSC SSC Board Exam Results) पेपर तपासण्यासाठी ६ हजार ६३० परीक्षक पेपर तपासणीचे काम करीत असून ११०५ इतके मॉडरेटर आहेत. दहावीची उत्तरपत्रिका तपासणीकामी ७ हजार २९७ परीक्षक काम करत आहेत. मंडळाने प्रत्येक परीक्षकाला 200 पेपर तपासणीसाठी पाठवले आहेत.
शिक्षकांनी टाकला होता बहिष्कार (HSC SSC Board Exam Results)
दरम्यान विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे शिक्षकांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी परत बोर्डाकडे पाठवल्या होत्या. या प्रकारामुळे दहावी-बारावीच्या निकालाला विलंब लागतोय की काय असा प्रश्न निर्माण झाला होता.
मात्र, शासनाने शिक्षक संघटनांच्या काही प्रमाणात मागण्या मान्य केल्यानंतर शिक्षकांनी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला आहे. सध्या सर्व पर्यवेक्षक दहावी, बारावीचा निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून वेळेत उत्तर पत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे प्रयत्न करीत आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पेपर तपासणीचे काम पूर्ण करून निकाल तयार करण्याच्या अनुषंगाने बोर्डाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (HSC SSC Board Exam Results) शिक्षण मंडळातर्फे दि. २१ ते १९ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली; तर दि. १ ते २६ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. २६ मार्चला दहावीचा भूगोल विषयाचा शेवटचा पेपर होणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com