करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (HSC Results 2023) माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच इयत्ता 12वीचा निकाल जाहीर केला असून यंदाचा संपूर्ण राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. कोकण विभागाने निकालात बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 96.01 टक्के लागला आहे, तर मुंबई विभागाचा सर्वात कमी 88.13 टक्के निकाल लागला आहे.
अनेक दिवसापासून विद्यार्थी आणि पालकांचं या निकालाकडे लक्ष लागून राहिलं होतं. यंदाच्या निकालातही पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. इयत्ता बारावीत 93.73 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 89.14 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
राज्यात सर्वाधिक निकाल लागलेल्या कोकण (HSC Results 2023) विभागानंतर पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि मुंबई विभागाने कामगिरी केली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 96.01 टक्के निकाल लागला आहे. तर मुंबई विभागाचा सर्वात कमी 88.13 टक्के निकाल लागला आहे. निकालाच्या टक्केवारीत पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुण्याचा 93.34 टक्के निकाल लागला आहे.
राज्याचा विभागवार निकाल – (HSC Results 2023)
कोकण 96.01 टक्के
पुणे 93.34 टक्के
कोल्हापूर 93.28 टक्के
औरंगाबाद 91.85 टक्के
नागपूर 90.35 टक्के (HSC Results 2023)
अमरावती 92.75 टक्के
नाशिक 91.66 टक्के
लातूर 90.37 टक्के
मुंबई 88.13 टक्के
निकालात मुलींची आघाडी
यंदा इयत्ता बारावीच्या परीक्षेत एकूण 91.25 टक्के विद्यार्थी पास (HSC Results 2023) झाले आहेत. त्यात विद्यार्थींनींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. या परीक्षेत एकूण 6,84,118 विद्यार्थी पास झाले आहेत. तर 6,08,350 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com