HSC Result 2020 | राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई | राज्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 90.66 टक्के इतका लागला आहे. मागच्या वर्षापेक्षा यंदा निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. यावेळी बारावी निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 95.89 टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी 88.18 टक्के लागला आहे.

राज्याचा बारावीचा विभागनिहाय निकाल :
कोकण – 95.89 टक्के, पुणे – 92.50 टक्के, कोल्हापूर – 92.42 टक्के, अमरावती – 92.09 टक्के, नागपूर – 91.65 टक्के, लातूर – 89.79 टक्के, मुंबई – 89.35 टक्के, नाशिक – 88.87 टक्के, औरंगाबाद – 88.18 टक्के

कसा पाहाल निकाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (16 जुलै) जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येईल. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटसह आणखी काही वेबसाईटवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. या वेबसाईटवर निकाल पाहता येणार? – www.mahresult.nic.in – www.hscresult.mkcl.org – www.maharashtraeducation.com

बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते. विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी आहेत. व्यावसायीक अभ्यासक्रामाचे 57 हजार 373 विद्यार्थी आहेत. आता या परीक्षेचा आज निकाल लागणार आहे, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com