HSC Re-Exam 2024 : 12 वी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 7 जूनपर्यंत करता येणार अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च (HSC Re-Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या कडून जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीच्या पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह उमेदवारांना दि. 7 जूनपर्यंत तर, विलंब शुल्कासह दि. 12 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.

या कालावधीत होणार पुरवणी परीक्षा
इयत्ता 12 वी च्या पुरवणी परीक्षेकरता अर्ज प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने १२ वी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, सर्वसाधारण (सायन्स, आर्ट्स, कॉमर्स) आणि द्विलक्षी (व्यावसायिक) अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे हे वेळापत्रक आहे. दि. १६ जुलै २०२४ पासून बारावी बोर्डाच्या पुरवणी (HSC Re-Exam 2024) परीक्षेला सुरुवात होणार आहे. दि. ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत हि परीक्षा चालणार आहे. सदर परीक्षा वेळापत्रकानुसार दोन सत्रांमध्ये घेतली जाणार असून, प्रथम सत्र सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत तर द्वितीय सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

यंदाचा 12 वी परीक्षेचा निकाल २१ मार्च २०२४ रोजी ऑनलाईन पद्धतीने (HSC Re-Exam 2024) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये घेण्यात येणार आहे. बारावी परीक्षेस पुर्नपरीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय (ITI) विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com