HSC Board Exam 2024 : राज्यात 12वी परीक्षा आजपासून सुरू, सुमारे 15 लाख विद्यार्थी देणार परीक्षा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च (HSC Board Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12 वी अंतीम परीक्षेस आजपासून (दि. 21) सुरुवात झाली आहे. इंग्रजीच्या पेपरने या परीक्षेस सुरवात झाली आहे; तर शेवटचा पेपर समाजशास्त्र विषयाचा असेल. ही परीक्षा दि. 19 मार्च 2024 पर्यंत सुरु राहणार आहे.

दोन शिफ्टमध्ये होणार पेपर
12वी बोर्डाची परीक्षा संपूर्ण राज्यात दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल. तर कृषी अभ्यासक्रमाच्या (HSC Board Exam 2024) परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहेत. तर बायफोकल अभ्यासक्रमाचे पेपर सकाळी 11 ते 1.30 या वेळेत घेण्यात येणार आहेत.
राज्यातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा
राज्यभरातील सुमारे 3,320 केंद्रांवर या परीक्षा घेण्यात येणार आहेत. यावर्षी 15 लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. गेल्या वर्षी 14,57,293 विद्यार्थ्यांनी 12वी बोर्डाची परीक्षा दिली होती.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना (HSC Board Exam 2024)
विद्यार्थ्यांनी शाळेच्या ओळखपत्रासोबत त्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत ठेवायचे आजे. प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. यंदा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १० मिनिटेही मिळणार नाहीत. विद्यार्थ्यांना नियोजित वेळेच्या किमान 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
परीक्षा हॉलमध्ये मोबाइल फोन, ब्लू टूथ उपकरणे आणि (HSC Board Exam 2024) स्मार्ट घड्याळे यासारखी इलेक्ट्रॉनिक गॅझेट नेण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांना फक्त पेपर लिहण्यासाठी आवश्यक स्टेशनरी वस्तू आणण्याची परवानगी आहे. याशिवाय पेपरची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमधून बाहेर पडू दिले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com