मोठी बातमी! विद्यापीठ परिक्षांसाठी गृहमंत्रालयाची परवानगी; विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई | व्यवसायिक, अव्यवसायिक पदवीच्या ७ ते ८ लाख विद्यार्थ्यांना आता अभ्यासाला लागावे लागणार आहे. कारण विद्यापीठ परिक्षांसाठी गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. UGC च्या गाईडलाईन नुसार विद्यापीठांना आता परिक्षा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. परिक्षा घेताना मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

परिक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास केले तर सदर विद्यार्थ्यांना कोरोना बँच म्हणुन शिक्का लागेल. तसेच या विद्यार्थ्यांना भविष्यात कोणतीही नोकरी मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गृहमंत्रालयाने विद्यापिठांना परिक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. गृहमंत्रालयाने लागू केलेल्या पत्रानुसार अंतिम सेमिस्टरची परीक्षा सक्तीची असेल आणि यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही परीक्षा घेण्यात येईल. तसेच आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) चेही पालन केले जाईल.

दरम्यान, विद्यापीठ परिक्षांबाबतच्या निर्णयामुळे राज्यातील राजकारण मागील काही दिवसांपासून तापले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अव्यावसायिक पदवीच्या अतिम परिक्षा रद्द केल्याची घोषणा केली होती. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने विद्यापीठ परिक्षांना परवानगी दिल्याने राज्य सरकार काय भुमिका घेतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com