करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी मिळणं म्हणजे (Highest Paying Salary Jobs in India) दिवास्वप्नच. भारतातील बहुतांश तरुण सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असतात. युवा वर्गासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे. जर तुम्हीही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुम्हाला देशातील सर्वोच्च सरकारी नोकऱ्यांबद्दल माहिती असायला हवी. आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप 5 सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकऱ्यांविषयी सांगणार आहोत.
1. IAS (Indian Administrative Service) – IAS हे पद देशातील सर्वोच्च पद मानले जाते. एका IAS अधिकाऱ्याला भारतात सर्वाधिक पगार मिळतो. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराचे मूळ वेतन सुरुवातीला 56,100 रुपये आहे. यासोबतच उमेदवारला इतर सरकारी (Highest Paying Salary Jobs in India) भत्त्यांचाही लाभ मिळतो. या पदावरील कमाल वेतन 2,50,000 रुपयांपर्यंत आहे. यामुळेच UPSC नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून ओळखली जाते.
2. IFS (Indian Foreign service) – IAS नंतर नंबर लागतो IFS पदाचा. भारतीय परराष्ट्र सेवेसाठी म्हणजेच IFS साठी निवडलेल्या उमेदवारांचे वेतन देखील IAS अधिकाऱ्याइतकेच असते. यामध्येही प्रारंभिक मूळ वेतन 56,100 रुपये आहे. यामध्ये प्रवास, आरोग्य, निवास यासह अनेक भत्ते मिळतात. हे काम आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आहे.
3. IPS (Indian Police Service) – UPSC नागरी सेवा परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची IPS अधिकारी म्हणून निवड केली जाते. एका IPS अधिकाऱ्याचे मूळ (Highest Paying Salary Jobs in India) वेतन रु.56,100 पासून सुरू होते. यामध्ये 8 वर्षांचा अनुभव असून, दरमहा 1,31,000 रुपयांपर्यंत पगारवाढ होते.
4. RBI Grade B (Highest Paying Salary Jobs in India) – भारतीय रिझर्व्ह बँक मधील ग्रेड बी नोकरी देखील सर्वात जास्त पगाराची नोकरी आहे. यामध्ये सुरुवातीचा पगार 67,000 रुपये आहे. यासोबतच उमेदवारांना इतर सरकारी भत्त्यांचाही लाभ मिळतो. या पदावर निवडलेले उमेदवार पुढे जाऊन देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार बनू शकतात.
5. न्यायाधीश (Judge) – भारतात न्यायाधीश होण्यासाठी जितकी मोठी जबाबदारी असते, तितकाच त्याचा पगारही तगडा असतो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना महिन्याला 2,25,000 रुपये पगार मिळतो. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचे वेतन 2,50,000 रुपये आहे. यासोबतच त्यांना इतर सरकारी भत्त्यांचाही लाभ मिळतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com