करिअरनामा ऑनलाईन | अडाणी लोकांच्या उपजीविकेचे साधन म्हणून शेतीला हिणवले जाते. मात्र आता आधुनिक पद्धतीने शेती करण्याच्याकडे तरुणांनी विशेष लक्ष देण्याकडे सुरूवात केली आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि कष्टाचा ताळमेळ घालून अनेक तरुण शेतीमधून लाखोंचे उत्पन्न घेत आहेत. असाच एक तरुण मुंबईतील नोकरी सोडून त्याच्या मूळगावी शेती करण्यासाठी येऊन, यशस्वी झाला आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या मध्य प्रदेशातील एका तरुणाने, नोकरी सोडून दहा एकर शेतीमध्ये तब्बल बारा टन काकडीचे उत्पादन घेऊन शेतीमधील त्याची सुरुवात मोठ्या यशाने केली आहे.
मध्यप्रदेशातील राघव उपाध्याय या तरुणाने डिजिटल मार्केटिंग ऑफीसर या पदाचा राजीनामा देऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. राघव हा मध्यप्रदेशातील कालामुखी या छोट्याशा गावचा रहिवाशी आहे. मुंबईमधील एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये तो डिजिटल मार्केटिंग ऑफिसर म्हणून काम करत होता. पण त्याला शेती आणि मातीसोबत असलेली आपली नाळ स्वस्थ बसून देत नव्हती. त्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन त्याने गावी जाऊन शेती करण्याचे ठरवले आणि त्यामधून त्याने लाखो रुपये कमावले आहेत.
राघव यांना पहिल्यापासून शेतीविषयी खूप जास्त प्रेम आहे. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून मुंबईमध्ये प्रतिष्ठित कंपनीमध्ये नोकरी मिळवली. परंतु काही वेगळे करण्याचा ध्यास त्यांना नोकरीमध्ये स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे ते गावाकडे आले आणि शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करू लागले. शेतीमधल्या पहिल्या मोठ्या यशानंतर त्यांनी बाकीच्या शेतीमध्ये फळबाग, टरबूज, कारली आणि काकडी अशा फळभाज्यांची शेती सुरू केली. या शेतीसाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. तंत्रज्ञानामुळे पाणी, शेती आणि खते वाचतात. खर्च कमी होतो. आणि श्रमही कमी लागतात. यामुळे शेती करणे सोपे होते. असे राघव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राघव यांच्या या प्रयत्नाचे विविध स्तरांमधून कौतुक केले जात आहे. तसेच त्यांच्याकडे वेगवेगळ्या भागांमधून नव आधुनिक शेतकरी तरुण मार्गदर्शनासाठी येतही आहेत.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com