Har Ghar Durga Abhiyan : मुलींना बनवणार फायटर!! महाविद्यालयात मिळणार आत्मसंरक्षणाचे धडे

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील प्रत्येक शासकीय (Har Ghar Durga Abhiyan) औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘हर घर दुर्गा’अभियानांतर्गत (Har Ghar Durga Campaign) हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण वर्षभर दिले जाणार आहे. यासाठी आयटीआय महाविद्यालयात मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणासाठी राखीव तासिका ठेवण्यात येणार आहेत; अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी दिली आहे.
या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना वर्षभर आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाच्या खास तासिकेप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण (Har Ghar Durga Abhiyan) प्रशिक्षणासाठी राखीव तासिका असावी, यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पाऊल उचलले आहे.

काय आहे अभियानाचा उद्देश (Har Ghar Durga Abhiyan)
राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातील घरोघरी अन्यायाविरुद्ध लढणारी दुर्गा असावी या उद्देशाने ‘हर घर दुर्गा अभियान’ सुरू करीत आहोत, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

सक्षमपणे लढण्याची ताकद महिलांना देण्यात येणार
हे प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य (Har Ghar Durga Abhiyan) घेण्यात येणार असून, विद्यार्थिनींना नियमित सराव करता येणार आहे. शारीरिक शिक्षणाप्रमाणेच वर्षभर महिलांसाठी कराटे, ज्युडो यांसारख्या स्वसंरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीत कमी २ तासिका घेण्यात येणार आहेत. त्याद्वारे आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत सक्षमपणे लढण्याची ताकद महिलांना देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com