करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत (Gramsevak) आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या कॅबिनेट मीटिंगमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीमधून कंत्राटी ग्रामसेवकांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. कंत्राटी ग्रामसेवकांचं मानधन थेट 10,000 रुपयांनी वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे ग्रामसेवकांसाठी हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल.
तसंच कॅबिनेटच्या या बैठकीमध्ये इतरही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना दिलासा देणारे काही निर्णय या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासह 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीही वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार लातूर इथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार (Gramsevak) असल्याचा निर्णय मंजूर करण्यात आला आहे. पुणे इथे चार अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयं स्थापन करणार असल्याचीही घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढवली जाणार आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार असून 1500 कोटींची मदत देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com