करिअरनामा ऑनलाईन । सरकारी विभागातील भरती जाहीर (Government Recruitment) झाली की आपण पाहतो की अमुक विभागात ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C किंवा ग्रुप D पदाच्या भरतीविषयी. मग असा प्रश्न पडणं साहजिक आहे की या श्रेणीमध्ये नक्की कोणत्या पदांचा समावेश होतो? आज आपण या लेखातून सरकारी भरतीच्या विविध स्तराविषयी जाणून घेणार आहोत.
प्रथम ही लक्षात घ्यायला हवं की सरकारी क्षेत्रातील नोकऱ्या विविध ग्रूप्समध्ये विभागलेल्या असतात. यामध्ये ग्रुप्स A, ग्रुप्स B, ग्रुप्स C, ग्रुप्स D या विभागांचा समावेश आहे. भारतातील (Government Recruitment) सरकारी क्षेत्रातील नोकऱ्यांचे वर्गीकरण या चार श्रेणीमध्ये केले जाते. वेगवेगळ्या स्तराप्रमाणे वेगवेगळी पदे तसेच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. या जबाबदाऱ्या आणि पदांनुसार या श्रेणी विभागल्या गेल्या आहेत. जर तुम्हीही सरकारी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
1. ग्रुप A (Government Recruitment)
सरकारी क्षेत्रातील ग्रुप A मध्ये विविध उच्च स्तरीय प्रशासनिक आणि व्यवस्थापनाची पदे असतात. जसं की, भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलिस सेवा (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) तसेच इतर केंद्रीय सेवा आणि राज्य या सेवांचा समावेश आहे. धोरण आखणे, कार्यक्रम राबवणे तसेच प्रशासकीय निर्णय घेण्यासारखी महत्वपूर्ण कामे या श्रेणीतील अधिकारी करतात. या पदांवर बसण्यासाठी ती व्यक्ती उच्च शिक्षित असणे गरजेचे आहे. UPSC तसेच विविध राज्य स्तरीय परीक्षांच्या आधारे या पदांवर नियुक्ती केली जाते.
2. ग्रुप B
ग्रुप B पदांवर निरीक्षक, वरिष्ठ अधिकारी, व्यवस्थापक आणि (Government Recruitment) इतर पदांचा समावेश असतो. या श्रेणीतील पदाधिकारी देखरेख आणि प्रशासकीय कामांमध्ये तसेच व्यवस्थापनेमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. या क्षेत्रात पदाधिकाऱ्यांची निवड UPSC तसेच विविध राज्यस्तरीय परीक्षांच्या आधारे केली जाते. ग्रुप B पदावर स्थान मिळवण्यासाठी ग्रुप A च्या तुलनेत उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमी असते.
3. ग्रुप C आणि ग्रुप D
सरकारी क्षेत्रातील ग्रुप C आणि ग्रूप D एकाच लेव्हलच्या (Government Recruitment) श्रेण्या असून, यातील पदाधिकाऱ्यांना ग्राउंड लेव्हलची आणि दैनंदिन कामकाज पहावे लागते. ग्रुप C आणि ग्रूप D या श्रेणीत लिपिक, टंकलेखक, स्टेनोग्राफर, कार्यालय सहाय्यक तसेच यांत्रिक अशा पदांचा समावेश असतो. या पदांच्या निवड प्रक्रियेत उमेदवारास कर्मचारी निवड आयोग (SSC) ची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. दरवर्षी या प्रत्येक श्रेणीतील पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येते आणि उमेदवाराचे शिक्षण आणि कौशल्याआधारे निवड केली जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com