करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या (Government Jobs) राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकूण 60 जागांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
संस्था – कृषी व पदूम विभाग, महाराष्ट्र शासन
भरले जाणारे पद – (Government Jobs)
1. लघुटंकलेखक – 28 पदे
2. लघुलेखक (निम्न श्रेणी) – 29 पदे
3. लघुलेखक (उच्च श्रेणी) – 03 पदे
पद संख्या – 60 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023
अर्ज फी – (Krushi Vibhag Recruitment)
अमागास – रु. 720/-
मागासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. 650/-
वय मर्यादा –
1. खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षे (Government Jobs)
2. मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. लघुटंकलेखक –
1.उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
2. लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
2. लघुलेखक (निम्न श्रेणी) –
1.माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. (Government Jobs)
2.लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
3. लघुलेखक (उच्च श्रेणी) –
1.माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2. लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
मिळणारे वेतन –
1. लघुटंकलेखक S-८ : २५,५००/- ते ८१,१००/- अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
2. लघुलेखक (निम्न श्रेणी) S-१४ : ३८६००- १२२८०० (सुधारित – S-१५ : ४१८००-१३२३००) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते (Government Jobs)
3. लघुलेखक (उच्च श्रेणी) S-१५ : ४१८००-१३२३०० (सुधारित – S-१६ : ४४९००-१४२४००) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवाराला कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतस्थळावर लॉगइन करावे लागेल.
2. अर्ज ६ एप्रिल २०२३ पासून सुरु होतील.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. या भरतीकरिता अधिक माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक ६ एप्रिल, २०२३ पासून दिनांक २० एप्रिल, २०२३ या कालावधीमध्ये करता येईल. (Government Jobs)
6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा
संगणक आधारीत ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे राहील:
काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com