Government Jobs : घरातूनच करा अर्ज; ‘या’ राज्यांमध्ये होतेय नवी रिक्रूटमेंट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । अनेक विद्यार्थी 12 वी पास झाल्यानंतर (Government Jobs) स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करू लागतात. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या व अशा नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारासांठी एक आनंदाची बातमी आहे. उत्तर प्रदेश, बिहार यासह अनेक राज्यांमध्ये आणि विभागांमध्येही सध्या विविधपदांसाठी नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. आज आपण कुठे व कोणत्या विभागात भरती सुरू आहे, हे जाणून घेणार आहोत.
पोलिस कॉन्स्टेबल, आरोग्य कर्मचारी तसेच शिक्षक यासह अनेक पदासांठी सध्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. या भरतीसाठी अर्ज कसा करावा,पात्रतेचे निकष काय आहेत, यासंदर्भातील आवश्यक माहिती पाहूया…

आरोग्य कर्मचारी भरती – 2023 (Government Jobs)
राजस्थान सरकारच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदासाठी भरती सुरु आहे. या अंतर्गत लॅब टेक्निशियनच्या 2,007 आणि सहाय्यक रेडिओग्राफरच्या 1,067 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 12वी पास असणे व त्याच्याकडे संबंधित विषयातील डिप्लोमा असणे आवश्यक आहे. 30 जून ही या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पोलिस कॉन्स्टेबल भरती – 2023
पोलिस विभागात कॉन्स्टेबल अथवा हवालदार पदाच्या 21,391 जागा रिक्त असून त्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. इंटरमीडिएट पास झालेले युवक या पदासाठी अर्ज करू (Government Jobs) शकतात. बिहार पोलिसांतर्फे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. csbc.bih.nic.in या अधिकृत वेबसाईटवर 20 जुलैपर्यंत उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

उत्तर प्रदेश पोलीस भरती – 2023
उत्तर प्रदेशमध्ये यूपी कॉन्स्टेबल किंवा हवालदार पदासाठी 52 हजारांहून अधिक जागांसाठी भरती होणार आहे. 12 वी पास असलेले युवक या पदांसाठी अर्ज करू शकतात. उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती बोर्डातर्फे यासंदर्भातील नोटिफिकेशन लवकरच जारी करण्यात येणार आहे. त्यानंतरच अर्ज प्रक्रिया सुरू होईल, असं वृत्त आहे.

JSSC Recruitment – 2023
झारखंड कर्मचारी निवड आयोगातर्फे पशुवैद्यकीय अधिकारी तसेच त्यासह एकूण 901 विविध पदांसाठी भरती केली जात आहे. या पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार jssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर 28 जून ते 27 जुलै या कालावधीत त्यांचा अर्ज दाखल करू (Government Jobs) शकतात. या पदासांठी अर्ज करण्याची ज्या उमेदवारांची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विभागाने जारी केलेली अधिसूचना तपासायची आहे. या विभागाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com