करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला (Government Jobs) तातडीने सुरुवात करून, ती वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल; अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी शिक्षण आणि भरती प्रक्रियेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
गेल्या सरकारच्या काळात सरकारी पदभरतीच्या प्रक्रियेत पेपर फुटीसारखे गैरप्रकार झाले. पेपर फुटीसारखे प्रकार होत असल्यास, हुशार आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांनी (Government Jobs) करायचे काय असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आवश्यक असून, त्यासाठी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’सारख्या कंपन्या नेमण्यात आल्या आहेत.
या कंपन्यांच्या विरोधात देशभरात एकही तक्रार नाही. पुण्यामध्ये पदभरती प्रक्रिया हा संवदेनशील विषय असून, कोचिंग क्लासची संख्या मोठ्या प्रमाणात (Government Jobs) आहे. त्यातही काही क्लासचे अजेंडे असतात. मात्र, यातूनही मार्ग काढून पदभरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात येईल,’ असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com