Government Jobs : वन विभागाने ‘या’ पदावर जाहीर केली सरळसेवा भरती; इथे आहे अर्जाची लिंक

Government Jobs (19)
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Jobs) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वन विभागाने रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून लेखापाल (गट क) पदांच्या एकूण 127 जागा भरल्या जाणार आहेत. सरळ सेवा भरती प्रक्रियेतून ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

संस्था – वन विभाग

भरले जाणारे पद – लेखापाल (गट क)

पद संख्या – 127 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जाहीर केली जाईल.

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

अर्ज फी – (Government Jobs)

अमागास प्रवर्ग – रु. 1000/-

मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 900/-

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

2. अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. (Government Jobs)

मिळणारे वेतन –

लेखापाल रु. 29,000 – 92,300/- दरमहा

वय मर्यादा –

Lekhapal Bharti 2023

असा करा अर्ज –

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकतील.
  3. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत
  4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (Government Jobs)
  5. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा.
  6. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना mahaforest.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  7. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.

निवड प्रक्रिया –

  1. ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, २०० गुणांची (एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल.
  2. लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल.
  3. लेखी परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतू वरील मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक परीक्षेच्या (इयत्ता १२ वी) दर्जाच्या समान राहील. (Government Jobs)
  4. परीक्षा ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात आयोजित करण्यात येईल.
  5. परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असेल.
  6. उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ४५% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार गुणवत्तेनुसार लेखापाल पदाकरीता पात्र राहतील. ४५% पेक्षा कमी गुण मिळविणारे उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com