Government Jobs : परराष्ट्र मंत्रालयात तब्बल 10 लाख पगाराची नोकरी; पात्रता फक्त ग्रॅज्युएशन

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Jobs) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशाच्या परराष्ट्र मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. मंत्रालयाने कन्सल्टंट पदावरील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे.
संस्था – परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार
भरले जाणारे पद – कन्सल्टंट
पद संख्या –  1 पद
वय मर्यादा – उमेदवाराचे वय 11 मे 2023 रोजी 25 ते 40 वर्षे असावे.
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2023

आवश्यक पात्रता आणि अनुभव – (Government Jobs)
1. उमेदवार भारतातील किंवा परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक.
2. विशेष डोमेन नॉलेज, ओरिजनल थिंकिंग, एव्हिडन्स ऑफ कंटेंट रायटिंग, रिव्ह्यूड पब्लिकेशन्स, जर्नल्स, वर्तमानपत्रे, माध्यमं, रिपोर्ट्स याबद्दल ज्ञान असावं, प्रतिष्ठित विद्यापीठातील कामाचा अनुभव, आंतरराष्ट्रीय घडामोडी, सार्वजनिक धोरणांमध्ये रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा (Government Jobs) थिंक-टँकचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल.
3. लेखन आणि प्रेझेंटेशन स्कील्समध्ये विस्तृत अनुभवाचा पुरावा.
4. मंत्रालयातील कामाचा पूर्वानुभव
5. फॉरेन लँग्वेजची माहिती
6. International Relation मध्ये मास्टर्स डिग्री आणि नामांकित शैक्षणिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय थिंक टँक/संस्थांमध्ये कामाचा अनुभव.
7. पब्लिक पॉलिसी, इंटरनॅशनल पब्लिक पॉलिसी, मानवी हक्क, डेमॉक्रसी इत्यादी विषयांतील मास्टर्स डिग्रीसह प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय थिंक टँक, संस्थांमध्ये कामाचा अनुभव.

मिळणारे वेतन – 10 लाख रुपये वार्षिक
नोकरीचा कार्यकाळ –
संबंधित पदावर 1 वर्षाच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर उमेदवाराची नियुक्ती केली जाईल. परंतु आवश्यकता आणि कार्यक्षमतेनुसार कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो. (Government Jobs)
नोकरी करण्याचे ठिकाण – परराष्ट्र मंत्रालय (साउथ ब्लॉक/जवाहरलाल नेहरू भवन/सुषमा स्वराज भवन/पटियाला हाउस/ISIL बिल्डिंग/अकबर भवन), नवी दिल्ली
असा करा अर्ज – इच्छुक उमेदवारांनी अधिकृत PDFमधून अर्ज डाउनलोड करुन व्यवस्थित भरुन आवश्यक कागदपत्रांसह पाठवावे.

अर्ज करण्याचा पत्ता –
अंडर सेक्रेटरी (PF&PG), मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, रूम नंबर4071, जवाहरलाल नेहरू भवन, 23-डी, जनपथ, नवी दिल्ली-110011 (Government Jobs)
सूचना – अर्जदारांची माहिती असलेल्या लिफाफ्यावर ‘Application for the position of Consultant in PP&R Division of Ministry of External Affairs’ असा उल्लेख असणं अनिवार्य आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (Government Jobs)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.india.gov.in/website-ministry-external-affairs
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com