करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी हा देशातील सर्वात (Government Jobs) आरामदायक आणि सुरक्षित नोकरीचा पर्याय मानला जातो. सरकारी नोकरीचे आकर्षण सर्वांनाच असते. या नोकरीच्या बाजारपेठेत आपण आपली कौशल्ये आणि पात्रता यांच्याशी जुळणारी सरकारी नोकरी शोधत असतो. तुमची ही शोध मोहीम सोपी व्हावी यासाठी आम्ही तुम्हाला सरकारी भरतीच्या जाहिराती विषयी एकात्रीत माहिती देत आहोत. या माहितीच्या आधारे तुम्ही विविध सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करु शकता.
SECL Recruitment 2024 : 1,425 पदे
South Eastern Coalfields Limited अंतर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतींतही पात्र उमेदवार https://www.secl-cil.in/index.php या वेबसाईट वरुन अधिक माहिती घेवून ऑनलाईन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे. SECL संस्थेतील एकूण 1,425 पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबवली जात आहे. यामाध्यमातून 1,075 तंत्रज्ञ शिकाऊ पदांसह 350 शिकाऊ पदे भरली जाणार आहेत.
UP Higher Judicial Services : 83 पदे (Government Jobs)
15 फेब्रुवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश उच्च न्यायिक सेवा 2023 साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाइट allahadahighcourt.in द्वारे उमेदवार उत्तर प्रदेश उच्च न्यायिक सेवासाठी अर्ज करू शकतात. या माध्यमातून वकिलांची 83 पदे भरली जाणार आहेत.
Indian Coast Guard Recruitment 2024 : 260 खलाशी पदे
भारतीय तटरक्षक दलाने 13 फेब्रुवारी रोजी नाविक (जनरल ड्युटी) या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार 27 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. यासाठी अधिकृत वेबसाईट cgept.cdac.in वरुन तुम्ही माहिती घेवू शकता. यामाध्यमातून सेलर जनरल ड्युटीसाठी 260 जागा भरल्या जाणार आहेत. भारतीय तटरक्षक दलाच्या अधिसूचनेनुसार, उत्तरेत 79, पश्चिमेत 66, ईशान्य भागात 68, पूर्वेत 33, उत्तर पश्चिममध्ये 12 आणि अंदमान आणि निकोबारमध्ये फक्त 3 पदे भरली जाणार आहेत.
TN TRB Teacher Recruitment 2024 : 1,768 माध्यमिक श्रेणी शिक्षक पदे
तामिळनाडू शिक्षक भरती मंडळ (TN TRB) सध्या त्यांच्या अधिकृत वेबसाइट trb.tn.gov.in द्वारे माध्यमिक श्रेणी शिक्षकांसाठी अर्ज स्वीकारत आहे. या भरती मोहिमेद्वारे, मंडळाचे (Government Jobs) राज्यभरात एकूण 1,768 माध्यमिक शिक्षक पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2024 आहे आणि भरती परीक्षा यावर्षी 24 जून रोजी होणार आहे.
IDBI Recruitment 2024 : कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापकांची 500 पदे
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) ने 2024 मध्ये कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM) च्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार idbibank.in या अधिकृत वेबसाईट वरुन अधिक माहिती घेवून दि. 26 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. या माध्यमातून 500 कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदे भरली जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com